Posts

पुस्तक परिचय - 'सांगावा - सचिन पाटील

Image
 गाव-खेड्यातील गोतावळा - 'सांगावा'

भारतीय मानवी जीवन हे प्रामुख्याने कृषीसंस्कृतीशी निगडित आहे. कृषीसंस्कृती आणि मानवी जीवन यांचा ऐकमेकांशी घनिष्ठ असा संबंध आहे. प्राचीन काळापासून चालत आलेला अतुट असा हा घनिष्ठ ऋणानुबंध, जिवापाड रुजलेला जिव्हाळा पण अलीकडे हे समिकरण बदलताना दिसते. ही नाळ आधुनिक माणूस तोडू पाहात आहे. पण त्याचे दुष्परिणामही आपण आज पाहात आहोत.

सचिन पाटील यांच्या 'सांगावा' या कथासंग्रहात आपणास भेटणारे खेडेगावातील शेतकरी, ग्रामस्थ, स्त्रिया, मुले, लहानमोठे प्राणी, पशुपक्षी, झाडझाडोरा, किडामुंगी आणि माणसे यांचा गोतावळा त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा, स्वभाव वैशिष्ट्यांचा, वर्तनांचा यातील कथानकाशी अगदी सहजासहजी संबध आला आहे. या वैशिष्ट्यपूर्ण वर्तनांचा उपमा, प्रतिमा, प्रतिके, दाखले यातून प्रत्ययकारी उल्लेख लेखकाने ग्रामीण शैलीत नादमधुर शब्दांत मोठ्या खुबीने केला आहे. आणि हे मांडताना कथानक सहजपणे प्रवाहित झाले आहे. हे संबंध इतके बेमालूमपणे आले आहेत, व्यक्त झाले आहेत, की ते दाखवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आटापिटा, ओढाताण झालेली जाणवत नाही. कथानकातील घटकांच्या प्रत्ये…

पुस्तक परिचय - नाते मनाशी मनाचे - कवी रमेश जाधव

Image
मनाचा मनाशी होणार सहज संवाद - नाते मनाशी मनाचे..

दर्जेदार प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेला कवी रमेश जाधव यांचा ' नाते मनाशी मनाचे ' हा काव्यसंग्रह वाचनात आला. 'कवितेत व्याकरणाइतकंच अंतःकरण महत्वाचं असत ' हे मानणाऱ्या अत्यंत संवेदनाशील कवीचा हा दुसरा काव्यसंग्रह. काव्यसंग्रहाच्या शीर्षकावरूनच कवीच्या काव्यलेखनाची अंत:सूत्रे लक्षात येतात.मानवी मन आणि नातेसंबंध हे कवितेतून व्यक्तिगत स्तरांवर व्यक्त होत असले तरी प्रत्येक वाचकाला कवितेतून येणारा अनुभव हे स्वतःचेच असल्याचे जाणवतात.अगदी सर्वसामान्य माणसालाही कवितेचा अर्थ लक्षात येईल इतक्या साधेपणाने व्यक्त होतात.प्रतिमा, रूपक, अलंकार आदी कोणत्याच साजश्रुंगाराचा मोह नसलेल्या या कविता मात्र प्रत्येक वाचकाशी आपले नाते जोडत असतात.
     आजूबाजूच्या सगळ्या नकारात्मक गोष्टींनी हवालदिल झालेल्या कवीच्या मनामध्ये एक वेगळीच लढाई सुरु असते. कवीच्याच शब्दांत सांगायचे झाले तर,

'असाच आहे मी
नदीच्या प्रवाहासारखा शांत
आतून मात्र खदखदलेला
पुरता विस्कटलेला '

     हे अंतस्थ  ज्वालामुखी आतल्या आत …

मराठी कविता - राघू शोधतो पानात - कवी राहुल निकम

Image
राघू शोधतो पानात

पक्षी झिंगले झाडात पान झाले लाले लाल
वेड्या  राघूने  मैनेचा  केला हळदुला गाल

केला हळदुला  गाल दाटे चोचीत गारवा
मुक्या हिरीला बोलतो काठा वरून पारवा

काठा  वरून  पारवा  सांगे  शकून कानात
माझ्या प्रियेला बोलवा लाज सांडल्या पानात

लाज सांडल्या पानात राघू मिचकतो डोळा
सावळ्याच्या हट्टापाई झाल्या गवळणी गोळा

झाल्या गवळणी गोळा खेळे चांदण्याचा चुरा
करी  लगट    राधेला   द्वाड  रानातला  वारा

द्वाड रानातला वारा त्याची आसमंती भूल
राघू शोधतो पानात लाल काळजाचे फूल

 राहुल निकम
 इंदापूर, जि. पुणे.   


साहित्य पुरस्कार - कवी देवानंद गोरडे काव्यपुरस्कार

Image
कवी देवानंद गोरडे काव्यपुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मातोश्री लक्ष्मीबाई मगरे प्रतिष्ठान दर्यापूर चे वतीने कवी देवानंद गोरडे काव्यपुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे .दि.01/04/2019 ते दि.31/03/2020 या कालखंडात प्रकाशित मराठी भाषेतील काव्यसंग्रह या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहेत .ईच्छुक प्रकाशन संस्था आणि कवींनी आपल्या कवितासंग्रहाच्या दोन प्रती , परिचय आणि एक फोटो दि.30/09/2020 पर्यंत पाठवावा .स्पर्धेसाठी प्राप्त संग्रहांचे परीक्षण जाणत्या समीक्षकांच्या एका समितीद्वारा करण्यात येईल आणि विजेत्या कवीस सन्मानचिन्ह आणि रोख रु 10000 /-प्रदान करण्यात येईल .एकापेक्षा अधिक  विजेते ठरल्यास रक्कम विभागून देण्यात येईल. पुरस्कार समारंभ कवी देवानंद गोरडेंच्या जन्मगावी टाकरखेडा (मोरे) ता.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती येथे दि.08 डिसेंबर 2020 ला समाज प्रबोधन विद्यालयाच्या सभामंडपात घेण्यात येईल. पुरस्कार स्विकारण्यास कवीने प्रत्यक्ष हजर राहणे बंधनकारक आहे.
साहित्य पाठविण्याचा पत्ता-.       रमेश मगरे ‘समन्वय’ वसंतनगर , दर्यापूर जि-अ…

मराठी साहित्यिक - संत तुकाराम महाराज

Image
संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.
                              भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते.त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.
                             गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत अस…

युट्युब - मराठी गझल, रोज स्टेटस पाहते आहेस तू, प्रशांत पोरे

Image
मराठी गझल, रोज स्टेटस पाहते आहेस तू, प्रशांत पोरे , marathi gazaal रसिकहो नमस्कार बालाजी डेवलपर्स प्रायोजित आणि ब्रह्मकमळ साहित्य संघ मुंबई व परिमल सांस्कृतिक व्यासपीठ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कविसंमेलन आणि गझल मुशायर्‍यात सादर झालेल्या सर्व रचना आपण या सीरिजमध्ये ऐकणार आहोत कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि गझलकार यांनी आपल्या रचना सादर केल्या एकेक करून त्या सर्व रचना आम्ही आपल्या संग ठेवणार आहोत अतिशय रंगतदार ठरलेल्या या कार्यक्रमात विश्वास कुलकर्णी, एजाज शेख, दास पाटील, कालिदास चवडेकर, आनंद पेंढारकर , विशाल राजगुरू, सुधाकर इनामदार, प्रशांत पोरे, सचिन कुलकर्णी, रवि वसंत सोनार, मानसी ताई केसकर आदी मान्यवर कवींच्या रचनांचा पंढरपूरकर साहित्य रसिकांनी मनमुराद आस्वाद घेतला त्याच रचनांचा सर्व साहित्य रसिकांना आस्वाद घेता यावा यासाठी कविता महाराष्ट्राची या चॅनलवर प्रसारित करीत आहोत आपल्याला आवडलेल्या रचनांना लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि आपण प्रथमच पाहत असाल तर अशाच रचना कविता वेळोवेळी पाहण्यासाठी सत्कार करून त्वर…

युट्युब - मराठी गझल I विठ्ठला I कवीश्रीकुल - सचिन कुलकर्णी

Image
काल मातीचा जरासा हुंदका मी ऐकला I मराठी गझल I विठ्ठला I कवीश्रीकुल - सचिन कुलकर्णी marathi gazal 

रसिकहो नमस्कार बालाजी डेवलपर्स प्रायोजित आणि ब्रह्मकमळ साहित्य संघ मुंबई व परिमल सांस्कृतिक व्यासपीठ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कविसंमेलन आणि गझल मुशायर्‍यात सादर झालेल्या सर्व रचना आपण या सीरिजमध्ये ऐकणार आहोत कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि गझलकार यांनी आपल्या रचना सादर केल्या एकेक करून त्या सर्व रचना आम्ही आपल्या संग ठेवणार आहोत अतिशय रंगतदार ठरलेल्या या कार्यक्रमात विश्वास कुलकर्णी, एजाज शेख, दास पाटील, कालिदास चवडेकर, आनंद पेंढारकर , विशाल राजगुरू, सुधाकर इनामदार, प्रशांत पोरे, सचिन कुलकर्णी, रवि वसंत सोनार, मानसी ताई केसकर आदी मान्यवर कवींच्या रचनांचा पंढरपूरकर साहित्य रसिकांनी मनमुराद आस्वाद घेतला त्याच रचनांचा सर्व साहित्य रसिकांना आस्वाद घेता यावा यासाठी कविता महाराष्ट्राची या चॅनलवर प्रसारित करीत आहोत आपल्याला आवडलेल्या रचनांना लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि आपण प्रथमच पाहत असाल तर अशाच रचना कविता वेळोव…

मराठी कविता - संतांची पालखी

Image
संतांची पालखी खाचखळग्यांची वाट वाट डोंगरदऱ्यांची तू गं ने आण करते गरजू नि ममत्वाची
कधी घेईना विसावा  नित्य चालते गं दिंडी उपजीविकेचे धाम तू ग लाखांची पोशिंदी
किती शोषण शोषण उपेक्षेने अवकळा असते तू सेवारत किती सोसूनिया झळा
येता आषाढी-कार्तिकी आई अंबा, गणपती भक्त नेता देवा दारी तोच आनंद नि भक्ती
निस्वार्थ तुझी सेवा निर भेदाची आलोखी तुझे पुण्य आले फळा झाली संतांची पालखी
कवी हिम्मत राजाराम बाविस्कर धुळे 9421890203
पुस्तक परिचय - भूमिका ( कथा संग्रह ) विद्या कुलकर्णी

Image
 ‘भूमिका’ हा सौ. विद्या कुलकर्णी यांचा कथासंग्रह शिवप्रज्ञा प्रकाशन, सोलापूर यांनी प्रकाशित
केलेला आहे. मुखपृष्ठ शिरीष घाटे यांनी साकारले असून मुद्रितशोधन पुरुषोत्तम नगरकर यांनी केले आहे. या  कथासंग्रहास सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांची प्रस्तावना लाभलेली आहे.       सौ. विद्या कुलकर्णी या कवयित्री म्हणून वाचकांना ज्ञात आहेत. त्यांचे ‘रे मना’, ‘गीतांजली’ हे काव्यसंग्रह  प्रसिद्ध आहेत.‘भूमिका’ कथासंग्रहाच्या माध्यमातून त्यांच्या कथा रसिकांसमोर येत आहेत.       स्त्रीशिक्षणाने स्त्रीच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. शिकल्यानंतर नोकरी करून संसाराची अर्धी आर्थिक  बाजू स्त्री सांभाळू लागली. त्यामुळे ती पुरुषांची खर्‍या अर्थाने ‘अर्धांगिनी’ झाली. विद्या कुलकर्णी यांच्या कथांत बहुतांशी, नोकरी करणार्‍या स्त्रियांच्या वाट्याला आलेली दु:खे चित्रित झाली आहेत.        स्त्रीचं जीवन हे दोन टप्प्यांत विभागलेलं असतं. सुरुवातीचा काळ आई-वडिलांच्या घरचा. तिथे तिचा जन्म, पालन-पोषण होते. दुसरा टप्पा म्हणजे लग्नानंतरचा. आई-वडील, बहीण, भाऊ अशी नाती दुरावून तिला  पतीच्या घरी सासू, सासरा, द…

साहित्य वार्ता - रत्नाकर मतकरी यांचे निधन

Image
जेष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचे निधन
गूढ कथांना वेगळा आयाम देणारे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे , काल (17 मे रोजी) रात्री साडेअकराच्या सुमाराला वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. मतकरींच्या निधनाने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
गेले काही दिवस रत्नाकर मतकरी यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेकअप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते, तिथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

साहित्य आणि कला क्षेत्रातील भरीव कामगिरी 1955 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी रत्नाकर मतकरी यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते.मतकरींची ‘लोककथा 78’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके…