मराठी कविता - विठ्ठला (गझल) - सचिन कुलकर्णी


विठ्ठला

मेघ एखादा तरी हा पाझरू दे विठ्ठला 
वाळलेले रान माझे मोहरू दे विठ्ठला

पीक शब्दाचेच येते वेदना जर पेरली 
काळजाला फक्त थोडे नांगरू दे विठ्ठला

काल मातीचा जरासा हुंदका मी ऐकला
थांब तू ,आधी तिला मज सावरू दे विठ्ठला

वेदनांना पार नाही दीन दुबळ्यांच्या , इथे 
वीट पायीची अता तर थरथरू दे विठ्ठला

चंद्रभागेला जरा तू सांग ना रे एकदा 
एवढा दुष्काळ सारा हा सरू दे विठ्ठला

Marathi-poem, marathi-booka, Marathi-sahitya
कवीश्रीकुल
सचिन कुलकर्णी
रोपळे (पंढरपूर )
बोला - ९०९६२५१२११
Post a Comment

0 Comments