साहित्य वार्ता - झुलवाकार उत्तम बंडू तुपे कालवश

भावपूर्ण श्रद्धांजली उत्तम बंडू तुपे

श्रमिक आणि उपेक्षितांच्या आवाज हरवला - जेष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे दुःखद निधन

uttam-bandu-tupe ,uttam-bandu-tupe-books
उत्तम बंडू तुपे


सातारा जिल्ह्यातील आणि खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त एनकूळ या गावी जन्मलेले थोर साहित्यिक उत्तम बंडू तुपे ( झुलवाकार ) आज दिनांक 26 एप्रिल 2020 आपल्याला सोडून गेले. अल्पशिक्षित असूनही कथा लघुकथा कादंबरी नाटक आत्मचरित्र असे विपुल लेखन करणारे हे लेखक म्हणजे निसर्गदत्त प्रतिभेचे जितेजागते उदाहरण होय. आंदण (लघुकथा संग्रह) इजाळ (कादंबरी) कळा (कादंबरी) कळाशी (कादंबरी) काट्यावरची पोटं (आत्मचरित्र) कोबारा (लघुकथा संग्रह) खाई (कादंबरी) खुळी (कादंबरी) चिपाड (कादंबरी) झावळ (कादंबरी) झुलवा (कादंबरी) नाक्षारी (कादंबरी) पिंड (लघुकथा संग्रह) भस्म (कादंबरी) माती आणि माणसं (लघुकथा संग्रह) लांबलेल्या सावल्या (कादंबरी) शेवंती (कादंबरी) संतू (कादंबरी) असे विपुल लेखन त्यांनी केले असून झुलवा ही त्यांची कादंबरी खूपच प्रसिद्ध झाली या कादंबरीने त्यांना मराठी साहित्य मध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून दिली . या कादंबरी वरूनच त्यांची झुलवाकार अशी ओळख निर्माण झाली
थोर साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांच्या जाण्याने मराठी साहित्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे . आज मराठी साहित्यातील अनेक साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि तुपे यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले आहेत , त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
तुपे हे जरी देहाने आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या साहित्याच्या रूपाने ते आपल्यात कायम जिवंत असतील त्यांचे साहित्य हे चिरकाल टिकणारे असून मानवी जीवनाला समृद्ध करणारे आहे
ईश्वर त्यांना सद्गती देवो अशा शब्दात कविता महाराष्ट्राची परिवार उत्तम बंडू तुपे यांना श्रद्धांजली वाहत आहे

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post