पुस्तक परिचय - देखणे हे दुःख आहे - कवी विष्णू सोळंके

देखणे हे दुःख आहे - कविता संग्रह - कवी विष्णू सोळंके

marathi-poetry-books, vishnu-solanke-amravati, marathi-poem
कवी विष्णू सोळंके
पुस्तक परिचय या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत अमरावतीचे कवी विष्णू सोळंके यांच्या देखणे हे दुःख आहे या पुस्तकाविषयी . विष्णू सोळंके हे एक प्रतिथयश व प्रतिभा संपन्न कवी आणि लेखक असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून वरिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते कविता ललित आणि प्रासंगिक लेखन करत आहेत.
              कवी विष्णू सोळंके यांचा देखणे हे दुःख आहे हा कविता संग्रह विजय प्रकाशन , नागपूर यांनी २५ ऑगस्ट २०१७रोजी प्रकाशित केलाअसून पुस्तकाची हि प्रथमावृत्ती आहे. प्रकाशक सचिन उपाध्याय यांनी या पुस्तकासाठी घेतलेले कष्ट पहिल्या नजरेतच लक्षात येतात. पुस्तक छान व्हावे यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. नॅचरल शेड कागदावर अतिशय स्पष्ट व सुंदर छपाईचे श्रेय नागपूरच्या रवींद्र आर्ट्स या मुद्राकाला द्यावे लागेल, अक्षर जुळणीही सुबक आहे . सुनील यावाळीकर यांनी मुखपृष्ठ केलेल्या या १०६ पाणी पुस्तकाची किंमत १५० रु आहे.
               कवीने हे पुस्तक शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यास आणि कष्ट करणाऱ्या मजुरास अर्पण केले आहे हे त्यांच्या संवेदनशीलतेचा परिचय देण्यास पुरेसे आहे. या पुस्तकातील कवितांबरोबरच या पुस्तकाचे आकर्षण केंद्र ठरते ती म्हणजे महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी गीतकार लेखक प्रा. प्रवीण दवणे यांची प्रस्तावना. सातत्य आणि अंतर्मुख होऊन नवे लेखन अधिक समृद्ध व सकस करण्याची कवीची वृत्तीच कवीच्या नव्या सशक्त कलाकृतींचे आश्वासन आहे असे प्रा. दवणे यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. कमी शब्दात नेमकेपणाने केलेली प्रस्तावना एकूणच पुस्तकाचे स्वरूप स्पष्ट करते.
            भोगलेल्या आणि सोसलेल्या माणसांचे मी आणि माझी कविता प्रतिनिधित्व करते अशा आशयाचे मनोगत कवी विष्णू सोळंके यांनी व्यक्त केले आहे. काही छंदोबद्ध तर काही मुक्तछंद कवितांनी सजलेला हा कविता संग्रह काव्य रसिकांना आवडावा असाच आहे. त्यामुळे हा कविता संग्रह काव्यप्रेमींच्या संग्रही असायला काहीच हरकत नाही.

marathi-poetry-books, vishnu-solanke-amravati, marathi-poem
देखणे हे दुःख आहे 

पुस्तकाचे नाव - देखणे हे दुःख आहे
कवी - विष्णू सोळंके
प्रकाशक - सचिन उपाध्याय
               विजय प्रकाशन, नागपूर
पृष्ठ संख्या - १०६
किंमत - रु. १५०/-

Post a Comment

1 Comments

  1. खुप सुंदर मार्मिक कविता संग्रह

    ReplyDelete

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.