संत ज्ञानेश्वर
![]() संत ज्ञानेश्वर |
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। अश्या शब्दात मराठी भाषेची थोरवी सांगणारे
संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकात म्हणजेच मराठी साहित्याच्या अगदी सुरुवातीच्या काळातील संत साहित्यिक होय
संत ज्ञानेश्वर
मूळ नाव- ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
जन्म- आपेगाव-पैठण, श्रावण कृष्ण अष्टमी, इ.स. १२७५
संजीवन समाधी- आळंदी, इ.स. १२९६
वडील- विठ्ठलपंत कुलकर्णी
आई रुक्मिणीबाई
भावंडे - निवृत्तीनाथ , मुक्ताबाई , सोपानदेव
वडीलबंधू निवृत्तिनाथ यांनाच गुरू मानत असत
साहित्यरचना- ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, हरिपाठ, अभंग, भक्ति कविता, चांगदेव पासष्टी ,स्फुटकाव्ये (अभंग, विराण्याआदि.)
संत ज्ञानेश्वर () हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी.
भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करत संत ज्ञानेश्वरांनी समाजातील सर्व थरांतील लोकांना ज्ञानाची कवाडे उघडी केली
ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना निवृत्तिदासु ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली.
संकलन व शब्दांकन - सचिन कुलकर्णी , पंढरपूर
![]() |
![]() |
![]() |
Tags:
मराठी साहित्यिक