पुस्तक परिचय - व्यथा ( कविता संग्रह ) कवी - दत्तात्रय चव्हाण

पुस्तक परिचय - व्यथा ( कविता संग्रह ) कवी - दत्तात्रय चव्हाण

marathi-books, marathi-sahityik-dattatray- chavhan
 व्यथा ( कविता संग्रह )
आमच्या वकिलीच्या व्यवसायात खूप धावपळीमुळे तसा वाचायला फार कमीच वेळ मिळतो. कधी कधी एखादं पुस्तक वाचायला घेतलं तरीही कामाच्या ताण तणावामुळे त्या वाचण्यात मन रमत नाही.  परंतु दत्तात्रय चव्हाण सरांचा कवितासंग्रह  ज्यावेळेस माझ्या हाती पडला, त्याच वेळी मी तो वाचायला घेतला, आणि नेहमीपेक्षा थोडे वेगळे घडले.  दरवेळी पुस्तक वाचताना कामाचा ताण  तणावामुळे वाचण्यात मन रमत नसे, पण यावेळी चव्हाण सरांच्या  कविता वाचताना मी कामाचा ताण विसरून गेलो.
              मला या कवितासंग्रहाचे नाव वाचूनच तो वाचावासा वाटला.  व्यथा म्हणजे दुःख, वेदना, यातना असा अर्थ, परंतु 'जे न देखे रवी ते देखे कवी' याप्रमाणे सरांनी त्याहीपलीकडे जाऊन खूप काही त्यामध्ये जाणवण्याचे, संग्रह वाचत असताना माझ्या लक्षात आले.
                    सिद्धेश्वराच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शेटफळ सारख्या गावात, इतका गुणवान साहित्यिक घडू शकतो, यावर प्रथम विश्वासच बसत नव्हता, परंतु पुस्तक वाचताना त्याची प्रचिती आली. जो माणूस गरीबी, दुःख, एकटेपणा अगदी लहानपणापासूनच अनुभवतो, त्यालाच वेदना निर्माण होतात. कोणी त्या वेदना शब्दाच्या रूपात कागदावर मांडतो व कवितेचा जन्म होतो असे मला त्यांचा व्यथा  हा कवितासंग्रह वाचताना जाणवले.
                    आज प्रत्येकाला वाटतं की शहराकडे चला गावात काय आहे ?  पण सरांकडे पाहिल्यावर मी म्हणेन कि " शहरात काय आहे ? इथे गावात काय कमी आहे ? कोणतीही सुविधा नसताना इतक्या सुंदर कविता लिहिल्या ते काय थोडे आहे ?
marathi-books, marathi-sahityik-dattatray- chavhan
कवी - दत्तात्रय चव्हाण

           या संग्रहातील प्रत्येक कवितेमध्ये समाजातील वास्तव चित्रण दिसत आहे.  प्रत्येक कवितेमधून आपण सामाजिक संदेश देण्याचा खूपच चांगला प्रयत्न केलेला आहे.  म्हणून मला सर्वच कविता अगदी मनापासून आवडल्या , 'परंतु उसळू द्या म्यानातून तलवार' आणि  शीर्षक कविता असलेली' व्यथा' या दोन कविता तर खूपच आवडल्या.
              ज्ञानदाना सारखं पवित्र काम आपण करत आहात.  आपल्याकडे आणखी एक गुण आहे तो म्हणजे वक्तृत्व.वक्तृत्व आणि काव्य वाचन स्पर्धांमधून आपण यश मिळवले आहे.  तसेच आपल्या 'माय मराठी मंडळाच्या' माध्यमातून आपण अनेक नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे .  आणि इतरांच्याही गुणांची कदर केलीत .  समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने आपण गावांमध्ये वाचनालयाची

marathi-books, marathi-sahityik-dattatray- chavhan
एड.श्री कुलदीप गायकवाड
स्थापना केली आणि समाजाला एक वेगळी आणि चांगली दिशा देण्याचे काम करत आहात. आपला  साहित्य प्रवास असाच चालत राहू दे , आणि यशाची कमान अशीच उंच उंच जात राहो  हीच ईश्वरचरणी प्रार्थना

एड.  श्री कुलदीप हैबतराव गायकवाड
मो. नं. - ९८६०६०४५९६


Post a Comment

0 Comments