मराठी साहित्यिक - राजेंद्र बलभीम भोसले

marathi-sahityik-rajendra-bhosale, marathi-book, marath-publishers
 राजेंद्र बलभीम भोसले
नाव : राजेंद्र बलभीम भोसले.(एम.ए., एम.फिल. (मराठी) विशेष प्राविण्यास विद्यापीठात प्रथम)
जन्मदिनांक : दि.-२६ जून १९६५
पत्ता : ब/९३, ‘आनंदयात्री’, राजस्वनगर, राजस्वनगर पिठाच्या गिरणीजवळ, विजापूर रोड,
     सोलापूर- ४१००४ दूरभाष -  ९८८१७८६४६६,  ७५८८०४६११८
व्यवसाय:  सेवानिवृत्त.(महाराष्ट्र शासन, कृषी विभाग. अनुरेखक पदावरुन)
प्रसिद्ध साहित्य (पुस्तके)

काव्यसंग्रह

१) ‘...बाकी सर्व ठीक आहे!’ (दोन आवृत्त्या)  २) ‘प्रारब्ध’

कथासंग्रह१) ‘पारंब्या’, ( तीन आवृत्त्या ),  २)‘विळखा’ ( चार आवृत्त्या ), ( महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड यादीत समाविष्ठ ) ३)‘अस्तित्व’  ४)‘कर्तव्य’,
५)‘छबिना’  ( दोन आवृत्त्या ) ( महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड यादीत समाविष्ठ )   ६)‘खोपट’ ( निवडक ग्रामीण कथा )  ७)‘ठराव’ ( निवडक विनोदी कथा ) ८)‘राजेंद्र भोसले यांच्या निवडक कथा’   ( गाजलेल्या निवडक कथा  )
कादंबरी१) ‘वणवा’ (दोन आवृत्त्या) (महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड यादीत समाविष्ठ)
समीक्षा१)‘साहित्य-विमर्श’ (७२ पुस्तकांची परीक्षणे)


एकूण प्रकाशित पुस्तके संख्या- १२
पुरस्कार :-
‘पारंब्या’ कथासंग्रहास मिळालेले पुरस्कार १) अंकुर सार्वजनिक वाचनालय, चांदूर, जि. अकोले यांचा ‘अंकुर साहित्य पुरस्कार’
२) शब्दगंध साहित्यिक परिषद, अहमदनगर यांचा ‘शब्दगंध साहित्य पुरस्कार’
३) काव्यपुष्पांजली मंडळ, टेंभुर्णी, ता.माढा, जि. सोलापूर यांचा ‘अक्षरधन साहित्य पुरस्कार’
४) आपला खान्देश व महाराष्ट्राची जत्रा प्रकाशन, शिरपूर जि. धुळे यांचा
    ‘खान्देशकन्या स्मिता पाटील पुरस्कार’
५) माढेश्वरी अर्बन डेव्ह.को.ऑप.बँक लि.माढा.जि.सोलापूर यांचा
    ‘आमदार बबनदादा शिंदे ग्रंथ पुरस्कार’
६) दहिवळ गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, शेवगाव, जि. अहमदनगर यांचा
    ‘दहिवळ गुरुजी स्मृती साहित्य पुरस्कार’
७) भि.ग. रोहमारे ट्रस्ट, कोपरगाव जि. अहमदनगर यांचा ‘भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार’
८) पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा ‘राम भोंडे कथा पुरस्कार’
९) सुर्वोदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव यांचा ‘गिरिजा कीर कथा वाङ्मय पुरस्कार’
१०) मनोरमा सोशल ङ्गाऊंडेशन आयोजित, मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी, सोलापूर यांचा 
    ‘मनोरमा  साहित्य पुरस्कार’
बाकी सर्व ठीक आहे!’ काव्यसंग्रहास मिळालेला पुरस्कार १)  डॉ. मिरदेव गायकवाड सार्वजनिक वाचनालय, कोरेगाव, जि. सातारा यांचा ‘ना.ह. आपटे पुरस्कार’
२) क्रांतिगुरू लहुजी साळवे राष्ट्रीय प्रतिष्ठान, मु. पो. आदेगाव,ता. हिमायतनगर, जि. नांदेड यांचा
    ‘अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार’
विळखा’ कथासंग्रहास मिळालेला पुरस्कार १) कोहिनूर ङ्गौंडेशन, मुंबईचा ‘कोहिनूर उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’
एकूण मिळालेले पुरस्कार संख्या-१३
इतर उल्लेखनीय७७ व्या व ७९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासह अनेक साहित्य संमेलने व संस्थांकडून ‘निमंत्रित कवी’ म्हणून सातत्याने काव्यवाचन सहभाग.
य वर्तमानपत्रे व नामवंत दिवाळी अंकांतून सातत्याने कविता, कथा, परीक्षण व ललित लेखन.
(दै. पुण्यनगरी, सोलापूर मधून सुमारे १२५ पुस्तक परीक्षणे लिहिली. )
 ‘कर्तव्य’ ही कविता औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या बी.ए.भाग-२ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट.
अनेक पुस्तक प्रकाशन व साहित्यिक उपक्रमांत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
१) राज्य निवडणूक आयोग व सोलापूर महानगरपालिका आयोजित ‘मतदार जागृती अभियान स्पर्धा-२०१६’ मध्ये सूचनात्मक लेख या विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (रु. १५०००/- रोख)
२) ‘बळीराजा डॉट कॉम’ या वेबसाईडने घेतलेल्या विश्‍वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ मध्ये ‘अवकाळी विळखा’ या ग्रामीण कथासंग्रहावर लिहिलेल्या पुस्तक समीक्षनास द्वितीय पुरस्कार
३) ‘राजेंद्र भोसले यांच्या निवडक ग्रामीण कथांचा अभ्यास’ या विषयावर सोलापूर विद्यापीठांतर्गत
सौ. अश्विनी सरवदे यांनी एम.फिल. केले. (सन-२०१९)
 प्रकाशनाच्या वाटेवर :-
१) कवी श्रीकांत मोरे यांच्या कविता ‘एम.फिल. अभ्यास प्रकल्प’ ग्रंथस्वरुपात.
२) ‘वेदना आपुलकीच्या’ काव्यसंग्रह .
३) ‘परतीचा प्रवास’ कथासंग्रह.
पदे१) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-सोलापूर ‘कोषाध्यक्ष’ पदावर पाच वर्षे काम पाहिले.
   ‘प्रसिद्धी प्रमुख’ म्हणून तीन वर्षे काम पाहिले.
२) मनोरमा साहित्य पुरस्कार निवड समितीवर ‘परीक्षक’ म्हणून सन-२०१२ पासून कार्यरत.
३) शिवप्रज्ञा प्रकाशन, सोलापूर चे ‘व्यवस्थापक’ म्हणून सन-२०१४ पासून कार्यरत.


       
       


Post a Comment

1 Comments

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.