जेष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचे निधन
![]() |
रत्नाकर मतकरी |
गेले काही दिवस रत्नाकर मतकरी यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेकअप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते, तिथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
साहित्य आणि कला क्षेत्रातील भरीव कामगिरी 1955 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी रत्नाकर मतकरी यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते.मतकरींची ‘लोककथा 78’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत.अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी मराठी साहित्यात रुजवला .
अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मोठ्यांसाठी एकूण सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची साहित्यसंपदा निर्माण करणाऱ्या मतकरी यांच्या . ‘गहिरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका रसिकप्रिय ठरल्या ,तर त्यांच्या ‘इन्वेस्टमेन्ट’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे . रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्वात त्यांचा समावेश होतो.
कौटुंबिक पार्शवभूमी रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुषा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
कविता महाराष्ट्राची परिवार रत्नाकर मतकरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे
![]() |
![]() |
![]() |
1 Comments
RIP
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.