साहित्य पुरस्कार - कवी देवानंद गोरडे काव्यपुरस्कार

कवी देवानंद गोरडे काव्यपुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे
Kavi devanand gorde kavya puraskar, kavita Maharashtrachi, sahitya puraskar
कवी देवानंद गोरडे काव्य पुरस्कार

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मातोश्री लक्ष्मीबाई मगरे प्रतिष्ठान दर्यापूर चे वतीने कवी देवानंद गोरडे काव्यपुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे .दि.01/04/2019 ते दि.31/03/2020 या कालखंडात प्रकाशित मराठी भाषेतील काव्यसंग्रह या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहेत .ईच्छुक प्रकाशन संस्था आणि कवींनी आपल्या कवितासंग्रहाच्या दोन प्रती , परिचय आणि एक फोटो दि.30/09/2020 पर्यंत पाठवावा .स्पर्धेसाठी प्राप्त संग्रहांचे परीक्षण जाणत्या समीक्षकांच्या एका समितीद्वारा करण्यात येईल आणि विजेत्या कवीस सन्मानचिन्ह आणि रोख रु 10000 /-प्रदान करण्यात येईल .एकापेक्षा अधिक  विजेते ठरल्यास रक्कम विभागून देण्यात येईल. पुरस्कार समारंभ कवी देवानंद गोरडेंच्या जन्मगावी टाकरखेडा (मोरे) ता.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती येथे दि.08 डिसेंबर 2020 ला समाज प्रबोधन विद्यालयाच्या सभामंडपात घेण्यात येईल.
पुरस्कार स्विकारण्यास कवीने प्रत्यक्ष हजर राहणे बंधनकारक आहे.

साहित्य पाठविण्याचा पत्ता-.      
Kavi devanand gorde kavya puraskar, kavita Maharashtrachi, sahitya puraskar
काव्य पुरस्कार
रमेश मगरे
‘समन्वय’
वसंतनगर , दर्यापूर
जि-अमरावती
444803
Mobile 9421463110.

पुस्तके शक्यतो रजि पोस्टाने (कुरियर नको) पाठवावी.

रमेश मगरे
अध्यक्ष
मातोश्री लक्ष्मीबाई मगरे प्रतिष्ठान, दर्यापूर.


Post a Comment

1 Comments

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.