राघू शोधतो पानात
![]() |
राघू शोधतो पानात, मराठी कविता |
पक्षी झिंगले झाडात पान झाले लाले लाल
वेड्या राघूने मैनेचा केला हळदुला गाल
केला हळदुला गाल दाटे चोचीत गारवा
मुक्या हिरीला बोलतो काठा वरून पारवा
काठा वरून पारवा सांगे शकून कानात
माझ्या प्रियेला बोलवा लाज सांडल्या पानात
लाज सांडल्या पानात राघू मिचकतो डोळा
सावळ्याच्या हट्टापाई झाल्या गवळणी गोळा
झाल्या गवळणी गोळा खेळे चांदण्याचा चुरा
करी लगट राधेला द्वाड रानातला वारा
द्वाड रानातला वारा त्याची आसमंती भूल
राघू शोधतो पानात लाल काळजाचे फूल
![]() |
कवी राहुल निकम |
राहुल निकम
इंदापूर, जि. पुणे.
![]() |
![]() |
![]() |
mast aahe kavita rahul ji
ReplyDeleteफार छान कविता सर
Deleteधन्यवाद
Delete