मराठी कविता - संतांची पालखी


marathi kavita santanchi palakhi
kavita maharashtrachi- pandharichi vari
संतांची पालखी
खाचखळग्यांची वाट
वाट डोंगरदऱ्यांची
तू गं ने आण करते
गरजू नि ममत्वाची

कधी घेईना विसावा 
नित्य चालते गं दिंडी
उपजीविकेचे धाम
तू ग लाखांची पोशिंदी

किती शोषण शोषण
उपेक्षेने अवकळा
असते तू सेवारत
किती सोसूनिया झळा

येता आषाढी-कार्तिकी
आई अंबा, गणपती
भक्त नेता देवा दारी
तोच आनंद नि भक्ती

निस्वार्थ तुझी सेवा
निर भेदाची आलोखी
तुझे पुण्य आले फळा
झाली संतांची पालखी
marathi poet - himmat baviskar
कवी - हिम्मत बाविस्कर
कवी
हिम्मत राजाराम बाविस्कर
धुळे
9421890203

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post