मराठी कविता - देश प्रेमी |
देश प्रेमी
टिळक गांधी यांचेकडे होती सत्याग्रहाची किल्ली,
भ्रष्टाचाराच्या फांदीवर बसलेत आता शेखचिल्ली
कधी,कसे पडतील,याची नाही त्यांना हमी,
कुठे भेटतात का हो आता खरे देशप्रेमी?
नाक्या-नाक्यावर उभा लोकशाहीचा रक्षक,
तरीही दिवसा ढवळ्या स्त्री होते भक्षक,
न्याय मिळेल का तिला ?नसे कायद्याची हमी
कुठे भेटतात का हो आता खरे देशप्रेमी ?
नम्रतेचे शोषण,खरेपणा बनला गुलामगिरीचा हेका,
ताठ मानेची खोटी दुनिया,हा सद्यस्थितीचा ठेका
नपुंसकतेचे जीवन कसे येणार कामी,
कुठे भेटतात का हो आता खरे देशप्रेमी ?
स्वार्थी,दिखाव्याची लालसा होत नाही दूर,
स्वातंत्र्य,प्रजासत्ताकदिनी येतो देशभक्तीला पूर
तिरंगा लावण्याची छातीवर,त्यांना येते खुमखुमी
कुठे भेटतात का हो आता खरे देशप्रेमी ?
पर्वत रांगांमध्ये लढतो आहे देशासाठी जवान,
सुजलाम सुफलाम,राबतो आहे शेतात किसान,
![]() |
डाॅ. सुनिता चव्हाण |
करुन स्वदेशीचा स्वीकार..परकीयांची करू नाकामी
जाणीव ठेवून आपणच होऊ खरे देशप्रेमी !
हिंसकतेचे ते किडेमकोडे,आहेत आपलेच गारदी,
ठेचावया त्यांना यावेत आता,सत्तेत अनेक पारधी
टिपून सावजांना द्यावी देशाला सलामी
आणि दाखवून द्यावे आम्ही आहोत खरे देश प्रेमी !!!
डाॅ. सुनिता चव्हाण,मुंबई.
-- माध्यमांवर भेटूया --
![]() |
|||
![]() |
![]() |
![]() |
![]() |