शायर डॉ. राहत इंदौरी यांचे दुःखद निधन - रसिक शोकसागरात
![]() |
डॉ. राहत इंदौरी |
दो गज ही सही ये मेरी मिल्कीयत तो हैं।
ये मौत तूने मुझे जमींदार कर दिया।
आशा शब्दात मृत्यूचे आभार मानून मृत्यूलाही हलक्यात मोजणारा कलंदर शायर ( कवी ) राहत इंदोरी आज (दि. ११ ऑगस्ट २०२०) रोजी आपल्याला सोडून गेले . १ जानेवारी १९५० ला मध्यप्रदेशातील इंदौर येथे राहत यांचा जन्म झाला . मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते . नुकतेच त्यांना निमोनिया झाल्याने रुग्णालयात भरती केले होते .त्यातच काल त्यांना कोरोना झाल्याचेही निष्पन्न झाले होते . कोरोना झाल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट करून आपल्या चाहत्यांना कळवले होते . हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाच मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राण ज्योत मालवली. 'त्यांच्या जाण्यानं भारतीय साहित्य क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे' अश्या भावना सामान्य रसिकांबरोबरच साहित्य,राजकीय,आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे![]() |
नाराज - डॉ. राहत इंदौरी |
गरिबी आणि कष्टात गेले .डॉ. राहत इंदौरी यांचे बालपण
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेलेल्या राहत यांनी . मिळेल ते काम करून शिक्षण घेतले . उर्दू मध्ये एम. ए . केल्यावर ,भोज यूनिवर्सिटीमधून त्यांनी उर्दू साहित्यात पी.एच.डी. मिळवली आणि जवळपास ३२ वर्षे प्राध्यापक म्हणून काम पहिले . मनाला स्पर्श करणारी शायरी ते लिहीत असत त्यामुळे गावखेड्यांपासून ते देशविदेशापर्यंत त्यांचे चाहते आहेत . देश विदेशातील अनेक कविसंमेलनात आणि मुशायर्यात त्यांनी आपली शायरी सादर केली आहे .
बुलाती हैं मगर जानेका नय
ह्या त्यांचा गझलच्या ओळी तर भारतातल्या कानाकोपऱ्यात पोचल्या होत्या . शायरी लिहिण्याची आणि सादर करण्याची त्यांची एक वेगळीच शैली होती . तसेच ते आपल्या शायरीतून नेहमीच राजकीय भाष्य हि करायचे त्यांच्या सर्वंकष लिखाणामुळे ते रसिकप्रिय शायर झाले होते. त्यांची शायरी ऐकायला हजारों रसिकांचा जमाव होत असे . त्यांची नाराज, मेरे बाद , दो कदम और सही , तसेच मौजूद अशी पुस्तके फारच लोकप्रिय ठरली.
![]() |
मौजूद - डॉ. राहत इंदौरी |
चित्रपट गीतकार म्हणूनंही मिळवली होती ओळख
डॉ. राहात यांनी चित्रपट क्षेत्रातही आपला ठसा उमटवला होता . त्यांनी लिहिलेल्या गीतांनी अनेक हिंदी चित्रपट सजले आहेत . त्यामध्ये मुन्ना भाई एमबीबीएस, मीनाक्षी, खुद्दार, नाराज, मर्डर, मिशन कश्मीर, करीब, बेगम जान, घातक, इश्क, जानम, सर, आशियां , मैं तेरा आशिक इ. चित्रपटांचा समावेश आहे .
सामाजिक भान असलेला संवेदनशील कवी
डॉ. राहत हे जसे आपल्या शायरीतून व्यवस्थेवर आसूड ओढत तसेच समाजातील अनेक गोष्टीकडे संवेदनशीलपणे पाहत असत . इंदौर मध्ये कोरोना वॉरियर्सवर हल्ला झाल्यावर डॉ. राहत यांनी भास्कर या वर्तमानपत्रात एक संदेश दिला होता तो असा " डॉक्टरांवर थुंकणाऱ्याचा मला कुणीतरी पत्ता सांगा ज्यामुळे मी त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याला सांगू शकेन कि बाबारे , का असा स्वतःचा , आपल्या समाजाचा, आपल्या, देशाचा , मानवतेचा शत्रू बनतो आहेस . या सर्वावर जरा दया दाखव . कोरोना हे काही राजकीय वाद नाही तर मानवतेला गिळंकृत करू पाहणारा सैतान आहे . ज्याच्या विरोधात आपण सर्वाना लढायचे आहे . त्यात हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण करू नको .
![]() |
डॉ. राहत इंदौरी |
भावपूर्ण श्रद्धांजली
डॉ राहत इंदौरी त्यांच्या रचनांमुळे रासिंकांच्या कायम स्मरणात राहतील , अश्या रसिकप्रिय शायरला साहित्य भारती आणि कविता महाराष्ट्राची कुटुंबाच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो![]() |
![]() |
![]() |
1 Comments
भावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.