साहित्य भारती - मराठी कविता - स्मरण सरी

स्मरण सरी

स्मरण सरी
स्मरतो अजुनी प्रेमाचा तो पहिला श्रावण ओला,
चालत होतीस गवतावरून, बिलगून बिलगून मला //

स्पर्श रेशमी पायाला अन, थंडगार वारा ,
दोघांनाही ओळखणारा दूर एक तारा ,
यांच्याखेरीज नव्हता कोणी सभोवती एकला ,
चालत होतीस गवतावरून, बिलगून बिलगून मला //

आपुले नाते ओठांवरती गाणारा तो पक्षी,
थेंब टपोरा बनवून गेला पाण्यावरती नक्षी ,
वेलींनीही सखे कोवळा स्पर्श तुझा जाणला ,
चालत होतीस गवतावरून, बिलगून बिलगून मला //

स्मरतो अजुनी प्रेमाचा तो पहिला श्रावण ओला,
चालत होतीस गवतावरून, बिलगून बिलगून मला //
कवीश्रीकुल

                     - कवीश्रीकुल ( सचिन कुलकर्णी ) 
                        मो. ९०९६२५१२११

-- माध्यमांवर भेटूया --

Post a Comment

0 Comments