मराठी कविता - 'माय'
- कवी - सागर गुरव
मराठी कविता - 'माय' - कवी - सागर गुरव
माझ्या आईच्या पदराला तीन रंगाचं ठिगाळ... माझ्या डोईवर साजे जणू तिरंगी आभाळ... माझ्या आईच्या गळ्यात नाही सोन्याचं डोरलं... तिच्या कपाळी कष्टाचं काळं गोंदण कोरलं... पिलांसाठी ती खंबीर भरभक्कम बाभळ... माझ्या डोईवर साजे जणू तिरंगी आभाळ... नाही क्षणाची उसंत नाही सुखाचा श्वास स्वतः उपाशी राहून मुखी भरवते घास... ऊब मायेची देऊन करी प्रेमानं सांभाळ... माझ्या डोईवर साजे जणू तिरंगी आभाळ... दिनरात राबते वं माय ऊन्हाततान्हात... माझं सपान पेरते तिच्या कष्टाच्या घामात... ऊंच भरारी घेण्याला देई पंखात ती बळ... माझ्या डोईवर साजे जणू तिरंगी आभाळ... - कवी: सागर मारुती गुरव. मु.पो. जवळगा पोमादेवी. ता. औसा. जि. लातुर. 7743898642.
0 Comments
आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.