“चौथा भारतीय मराठी हायकू दिवस साजरा” “राधेश हायकू पुस्तकाचे प्रकाशन ”

“तंत्र सांभाळून लिहिल्यास हायकू प्रभावशाली होतो...”  -रवि वसंत सोनार 

“चौथा भारतीय मराठी हायकू दिवस साजरा”

“राधेश हायकू पुस्तकाचे प्रकाशन संपन्न” 


radhesh hayku,radhesh badale patil, nishad prakasshan
राधेश हायकू पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर

पंढरपूर (प्रतिनिधी):- “ हायकू लेखन करताना बाह्यघाट, विषयाची निवड, तिसऱ्या ओळीतील कलाटणी आणि सुयोग्य यमक हे तंत्र व्यवस्थित वापरुन लेखन केल्यास हायकू अत्याधिक प्रभावाखाली होतो.” असे मत येथील साहित्यिक व हायकूकार कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते येथील निषाद प्रकाशन आणि साहित्यिक मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित चौथ्या अखिल भारतीय मराठी हायकू दिनाच्या औचित्याने “राधेश हायकू” या पुस्तक प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि वसंत सोनार म्हणाले - “ राधेश हायकू या संग्रहातील हायकू हे वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असून वाचकांना हायकूंचा आनंद तर मिळेलच शिवाय वाचकांचे शब्दभांडार निश्चितच वाढेल इतके वैविध्यपूर्ण शब्द या हायकू संग्रहामध्ये आहेत

निषाद प्रकाशाची पुस्तके

सवलतीच्या दरात आजच खरेदी करा

          “ राधेश हायकू” या हायकू संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर कवी रवि वसंत सोनार यांच्या बरोबरच निषादच्या प्रकाशिका मनिषा कुलकर्णी, हायकूकार राधेश बादले पाटील तसेच अध्यक्षस्थानी भक्ती रत्नपारखी हे मान्यवर उपस्थित होते.

radhesh hayku,radhesh badale patil, nishad prakasshan
 हायकूकार राधेश बदल पाटील यांचा सत्कार 


        अध्यक्षस्थानावरून बोलताना भक्ती रत्नपारखी म्हणाल्या - “ वैविध्यपुर्ण विषयातील  बहू अर्थांनी समृद्ध असलेला, भक्ती - शृंगार रसातील क्षणयुक्त कलाटणीतील चित्ताकर्षक शद्बसेवेचा मानबिन्दू म्हणजे राधेश हायकू हे पुस्तक होय.” 


“क्षणयुक्त चित्ताकर्षक शद्बसेवेचा मानबिन्दू म्हणजे राधेश हायकू” - भक्ती रत्नपारखी

सत्काराला उत्तर देताना पुस्तकाचे लेखक आणि हायकूकार राधेश बादले पाटील म्हणाले - “ राधेश हायकू हे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक साहित्यिक, मित्रमंडळी तसेच हितचिंतकांचे प्रेरणा - प्रोत्साहन यामुळे आणि सुक्ष्म सामाजिक अवलोकन यामुळे या संग्रहात वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील हायकू समाविष्ट आहेत.” 

radhesh hayku,radhesh badale patil, nishad prakasshan
पुस्तकाविषयी बोलताना हायकूकार रवी सोनार

          कोरोना कालावधीत योग्य अंतरावर फक्त पंचवीस साहित्य रसिक मान्यवर व्यक्तींसाठी आसन व्यवस्था असलेल्या “राधेश हायकू” या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाची सुरुवात हायकूकार राजेंद्र झुंबर भोसले यांच्या हायकू सादरीकरणाने झाली. तर साहित्यिक मंदार केसकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश घळसासी,  शिवसेना युवा नेते संदिप केंदळे, राष्ट्रवादीचे युवा नेते संदिप मांडवे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांची समयोचित शुभेच्छापर भाषणे झाली. कार्यक्रमास पंढरपूरचे नगरसेवक धनंजय कोताळकर, गटनेते सचिन कुलकर्णी, उद्योजक नागनाथ ताठे देशमुख, ज्येष्ठ कृषीतज्ञ भारतभाऊ रानरुई, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख किरणराज घाडगे, डॉ. आनंद भिंगे,  कवयित्री शोभाताई माळवे, संगीताताई मासाळ, आशाताई पाटील, सविता रवि सोनार, कवी गणेश गायकवाड, समीक्षा पब्लिकेशन्सचे प्रविण भाकरे आदि  मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनवाणीकार अंकुश गाजरे यांनी केले. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन गझलकार कवी सचिन कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निषाद प्रकाशन, साहित्यिक मित्र परिवार तसेच राधेश बादले पाटील मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.-- माध्यमांवर भेटूया --

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post