साहित्य भारती - मराठी कविता - माझे बाबा - पुरुषोत्तम पटेल

माझे बाबा (कविता)

बाबा खूप थकला तुम्ही थांबा न आराम करा आता
माझंही थोड ऐका... तुमच्या चरणी ठेवितो माथा!

माहिती आहे बाबा मला तुमच्या जीवनाची सुंदर गाथा
सहस्र  पानांची होईल तुमच्या कर्तृत्वाची एकेक कथा

बाबा,तुम्हीच हात दिला मला बालपणी चालतांना पडलो जेव्हा
शाळेची फी साठी तुम्ही वापरली सदरा-ईजार ठिगळ लावून तेव्हा 

स्वतःची मौजमजा बाजूला केली जे हवं ते सारं मला दिलं
आजही फिटली नाही बाबा माझ्यासाठीच्या खर्चाची बिलं  

मला आजही आठवतात बाबा माझ्या आजारपणाचे दिवस
आईला  धिर देत  तुम्ही   बसले उशाशी माझ्या रात्रंदिवस               

बाबा, लहानपणी माझा हट्टापायी तुम्ही हत्ती-घोडा व्हायचे!
पाठ अन् अंग  दुखेपर्यंत मला अख्खा वाडाभर मिरवायचे   

चिखल लागू नये पायाला तुमचा खांद्यावर बसून केली मी मज्जा
मी अनुभवला आनंद अन् माझं ओझे वाहण्याची तुम्हाला सजा

माझ्या भल्यासाठी बाबा तुम्ही एकच वापरला चपलांचा जोड
घरात होते नव्हते सारे काही तुम्ही व आईने दिली सारी मोड  

उपवासाचा नावाने उपाशी राहून मला मुखी घास भरविले
अनंत  खस्ता खाऊन   बाबा  तुम्ही  मला  सुशिक्षित केले          

बाबा, माझ्या  सर्व  सुखाचे  तुम्हीच  तर  खरेखुरे  धनी
मी फक्त  निमित्त हो  सारे  सुख उपभोगा ही माझी हमी 

तुम्ही म्हणता न् बाबा,बेटा! तू तर  माझ्या स्वप्नांतील रत्न
तुम्ही  फक्त हाक  द्या साद  देण्यासाठी करीन सारे यत्न 

बाबा,मला जाणीव आहे हो माझ्यावरील तुमच्या ऋणाची
स्विकारा न् आतातरी सेवा त्यातून थोडं उतराई होण्याची....! 

पण...बाबा, तुम्ही आता ऐकायचं श्रमातून निवृत्त व्हायचचं!

 प्रा.पुरुषोत्तम मगन पटेल
" पुष्प "
म्हसावद, ता.शहादा
marathi poem, maze baba, purushottam patel ,sahitya barati-----------------------------------------------
- महत्वाचे - 
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित मजकुरात व्यक्त केलेली मतांशी साहित्य भरतीचे संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. 
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित साहित्याचे सर्वाधिकार ( कॉपी राईट ) त्या-त्या  साहित्यिकांकडे आहेत. हे साहित्य पूर्वी इतरत्र प्रकाशित झालेले असू शकते. तसेच ते पुन्हा कोणत्याही प्रकारे प्रकाशित करण्याचा सुद्धा अधिकार साहित्यिकांचा आहे. पुन्हा प्रकाशित करताना पूर्व प्रसिद्धी म्हणून साहित्य भारतीचा उल्लेख करू शकता. या साहित्याचा पूर्ण अथवा अंशतः भाग संबंधित साहित्यिकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे प्रकाशित करू नये. तसे आढळून आल्यास कॉपीराईट कायद्यान्वये कारवाई होऊ शकते. 

-- माध्यमांवर भेटूया --

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post