साहित्य भारती - साहित्य वार्ता - पुस्तक प्रकाशन - प्रा. इंद्रजित पाटील - जीवनाचा उपासक कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी व चाकरी

मा.सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रा.इंद्रजीत पाटील लिखित जीवनाचा उपासक-कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी या पुस्तकाचे, चाकरी या कवितासंग्रहाचे व प्रमाेद पाटील प्रकाशित परिस्पर्श या स्मरणिकेचे प्रकाशन 

book publication, lohkare guruji, chakari, poem, marathi literature, indrajit patil, sushilkumar shinde, sahitya bharati


"कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर जगदाळे मामा यांचा आदर्श घेऊन कर्मवीर लोहकरे गुरुजी यांनी गौडगाव सारख्या ग्रामीण भागात ज्ञानगंगा सुरू केली आहे लोहकरे गुरुजींचा परीसस्पर्श लाभल्याने अनेक ज्ञानाची उपासक निर्माण झाले आहेत" असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले ते इंद्रजीत पाटील लिखित पुस्तक प्रकाशन  समारंभात बोलत होते
प्रा इंद्रजीत पाटील लिखित "जीवनाचा उपासक" या चरित्र ग्रंथाचे व "चाकरी" या कवितासंग्रहाचे माजी गृहमंत्री मा.सुशीलकुमारजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन  झाले. गाैडगाव,ता.बार्शी या ठिकाणी श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने या कार्यक्रम आयोजित केला हाेता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार निर्मलाताई ठाेकळ यांनी भूषविले. तर मा.अरूण जाखडे (लेखक/प्रकाशक) मा.शाहू पाटाेळे (भारतीय माहिती सेवा,निवृत्त उपसंचालक) मा.प्राचार्या डाॅ.नसीम पठाण (माजी उपमहापौर,साेलापूर) ज्येष्ठ साहित्यिक, मा.राजेंद्र भोसले, मा.मारूती कटकधाेंड, साै.वंदना कुलकर्णी, मा.राजेंद्र अत्रे,उस्मानाबाद, काकासाहेब शिंदे,लातूर, मा.प्रा.डाॅ.सुनील विभुते,बार्शी, प्रा.डाॅ.दत्तात्रय जमाले,( श्री.शिवाजी महाविद्यालय,बार्शी), ह.भ.प.माऊली महाराज,मेडसिंगा (उपाध्यक्ष ग्रंथालय संघ,उस्मानाबाद)  वृत्तनिवेदिका साै.रेणुका बुधाराम, साै.जयश्री माने तसेच मा.चेतन नरूटे (विराेधी पक्ष नेते साेलापूर महानगरपालिका) मा.बंगाळे साहेब (युवा नेते,काँग्रेस पार्टी,साेलापूर) मा.अरूण शहाजीराव पाटील,नरखेड,ह.भ.प.रंगनाथ काकडे,वैराग, कवी रामप्रभू माने,साेलापूर आदी मान्यवर उपस्थित होते.मा.सुशीलकुमारजी शिंदे व इतर मान्यवरांनी कवी/लेखक इंद्रजीत पाटील यांच्या लेखणीचे काैतुक  केले. 
  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.विनायकराव गरड यांनी केले. सुत्रसंचालन श्री.अरविंद चव्हाण सर तर आभार प्रदर्शन मा.पंडितराव लाेहाेकरे यांनी केले. 
  कार्यक्रमास काेराेनामुळे मर्यादित लाेकांनाच निमंत्रित केले व काेराेनाच्या सर्व अटी,नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.जीवनाचा उपासक-कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी व चाकरी या कवितासंग्रहाचे मा.सुशीलकुमारजी शिंदे साहेब व इतर ज्येष्ठ साहित्यिकांनी अभ्यासू विवेचन केले.आणि लालित्यपूर्ण लिखाणाचे विशेष काैतुक केले. मा.सुशीलकुमारजी शिंदे साहेबांनी हा चरित्र ग्रंथ पूर्ण वाचून ती वाचलेली प्रत लेखकाला भेट दिली. साहित्य रसिक या दोन्ही पुस्तकांना प्रतिसाद देतील अशी अशा साहित्यिक इंद्रजित पाटील यांनी व्यक्त केली. इंद्रजित पाटील यांची चातक-(कवितासंग्रह), चाकरी-(कवितासंग्रह), जीवनाचा उपासक-कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी-(चरित्र ग्रंथ) हि पुस्तके प्रकाशित झाली असून, सुवासिनीचं कुंकू-(तीन अंकी नाटक), शेलक्या बारा-(कथासंग्रह), काव्यगाणी-(कवितासंग्रह), चाराेळीची आराेळी-(चाराेळी संग्रह) हि पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. 

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post