साहित्य भारती - मराठी कविता - नवरंगोत्सव - ज्योत्स्ना तानवडे

नवरंगोत्सव

नवरात्रीची पहिली माळ 
चंद्रघटेचा करडा शालू 
असुरशक्तींचा नाश करी 
माऊलीस श्रद्धा पुष्पे घालू !!

 नवरात्रीची दुसरी माळ 
ब्रह्मचारिणीचा शालू केशरी 
ज्ञान दे, शांती दे,सर्वकाळी 
अज्ञान तमासी दूर करी !!

नवरात्रीची तिसरी माळ 
चंद्रघटेचा शालू पांढरा 
निर्मळ पवित्र शांती देई
प्रार्थनेने उजळे गाभारा !!

नवरात्रीची चवथी माळ 
कुष्मांडा नेसली शालू लाल 
शौर्य शक्तीचे प्रतिक हेचि 
अंगी संचरे शक्ती जहाल !!

नवरात्रीची पाचवी माळ 
स्कंदमातेची पैठणी निळी
शक्ती ऊर्जेचा निळा रंग हा 
शौर्य तेज लखलखे भाळी !!

नवरात्रीची सहावी माळ 
कात्यायनीचा शालू पिवळा 
आनंद,उत्साह,ओजस्विता 
ओसंडे,लाभे मोद आगळा !!

नवरात्रीची सातवी माळ
कालरात्रीला शालू हिरवा 
सृजनता,निसर्ग समृध्दीचे 
वरदान देई आई शिवा !!

नवरात्रीची आठवी माळ 
महागौरीचा शालू मोरपिशी
शांत उत्साही प्रसन्नतेने
मने भक्तीत रमावी तशी !!

नवरात्रीची नववी माळ
सिध्दिदात्रीचा शालू जांभळा
आत्मशक्तीचा बोध घेऊनी
ध्येय,जिद्दीला देई उजाळा !!

नऊ रंगांचा उत्सव देई 
विविध गुणांचा बोध मना 
सद्गुण अंगी बाणविता 
लाभे परम सौख्य या मना !!

ज्योत्स्ना तानवडे
पुणे.५८

marathi poem, jotsna tanvade, kavita, navratri, sahitya bharati


-----------------------------------------------
- महत्वाचे - 
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित मजकुरात व्यक्त केलेली मतांशी साहित्य भरतीचे संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. 
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित साहित्याचे सर्वाधिकार ( कॉपी राईट ) त्या-त्या  साहित्यिकांकडे आहेत. हे साहित्य पूर्वी इतरत्र प्रकाशित झालेले असू शकते. तसेच ते पुन्हा कोणत्याही प्रकारे प्रकाशित करण्याचा सुद्धा अधिकार साहित्यिकांचा आहे. पुन्हा प्रकाशित करताना पूर्व प्रसिद्धी म्हणून साहित्य भारतीचा उल्लेख करू शकता. या साहित्याचा पूर्ण अथवा अंशतः भाग संबंधित साहित्यिकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे प्रकाशित करू नये. तसे आढळून आल्यास कॉपीराईट कायद्यान्वये कारवाई होऊ शकते. 

-- माध्यमांवर भेटूया --

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post