मी कविता का लिहिते
(अष्टाक्षरी)
चंद्र हासतो आकाशी ,
पडे टिपूर चांदणे .
शोभा त्याची वर्णायाला ,
माझे कविता लिहिणे ....१
समुद्राच्या काठावर ,
लाटा धडकती किती.
रौद्र रूप रेखाटण्या ,
घेते लेखणी मी हाती .....२
उंच डोंगराच्या माथी ,
दाटी जलदांची होते .
हाती कुंचला नसतो ,
चित्र कविता काढते .....३
समाजाच्या बोलण्याने ,
मन विषन्नते जेव्हा .
पचवते कटू बोल ,
काव्य प्रसवते तेव्हा ....४
अत्याचार भ्रष्टाचार ,
जात-पात , नीती-धर्म .
माझी लेखणी लिहीते ,
समाजाच्या उद्धारार्थ ....५
कधी सुख कधी दुःख ,
उन-पावसाचा खेळ .
हाती धरता लेखणी ,
स्फुरे मना काव्य ओळ .....६
राष्ट्रप्रेम जेव्हा कधी ,
येते मनात दाटून .
राष्ट्रभक्ती जागवण्या ,
होते कविता लेखन .....७
निसर्गाची हाक माझ्या ,
देते साद अंतरास .
शब्दा फुटती धुमारे ,
येतो मोहर काव्यास .....८
ईश्वराच्या निर्मितीचे ,
करावया कवतुक .
भक्ती भाव प्रसवते ,
काव्य माझे एक एक ......९
माझी सखी , माय-तात ,
माझा श्वास माझे काव्य .
मला सांभाळी वाढवी ,
जरी नसे भव्य दिव्य .....१०
रेखा कुलकर्णी ©®
चिंचवड पुणे
-----------------------------------------------
- महत्वाचे -
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित मजकुरात व्यक्त केलेली मतांशी साहित्य भरतीचे संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित साहित्याचे सर्वाधिकार ( कॉपी राईट ) त्या-त्या साहित्यिकांकडे आहेत. हे साहित्य पूर्वी इतरत्र प्रकाशित झालेले असू शकते. तसेच ते पुन्हा कोणत्याही प्रकारे प्रकाशित करण्याचा सुद्धा अधिकार साहित्यिकांचा आहे. पुन्हा प्रकाशित करताना पूर्व प्रसिद्धी म्हणून साहित्य भारतीचा उल्लेख करू शकता. या साहित्याचा पूर्ण अथवा अंशतः भाग संबंधित साहित्यिकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे प्रकाशित करू नये. तसे आढळून आल्यास कॉपीराईट कायद्यान्वये कारवाई होऊ शकते.
-- माध्यमांवर भेटूया --
![]() |
|||
![]() |
![]() |
![]() |
![]() |