About Us

साहित्य भारती हा एक खुला मंच असून प्रत्येक मराठी साहित्यिकाला मोफत खुला आहे.
साहित्य भरती अनेक समाज माध्यमाद्वारे साहित्यिक आणि रसिक यांच्यामधला दुवा बनण्याचा प्रयत्न करत आहे . त्यामध्ये युट्युब, फेसबुक, वेबसाईट,ट्विटर, टेलिग्राम अश्या माध्यमांचा समावेश आहे. मंचाच्या माध्यमातून आपण हजारो रसिकांपर्यंत विनासायास पोहचू शकणार आहोत, ते ही विनामूल्य त्यासाठी आम्ही कोणाकडून कसलेही शुल्क, अगदी छुप्या पद्धतीनेही घेत नाही. तर आपण आता साहित्य भरती हि वेबसाईट काय आणि कशासाठी आहे ? हे पाहू .

उद्देश
साहित्य भरती या वेबसाईटचा उद्देश काय आहे ? हे या साईटवर असलेल्या (पेज) विभागानुसार आपण जाणून घेऊ

साहित्यिक
या पेजवर सर्व नव्या जुन्या साहित्यिकांची माहिती एकत्र करून, ती सर्व रसिक वाचकांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, तसेच नव्या पिढीला आपल्या साहित्यिक समृद्धीची ओळख व्हावी, हा हेतू या साईटचा आहे . या पेजवर आपण सर्व  साहित्यिकांची यादी करत आहोत, अगदी आपल्या संतांपासून ते आजच्या नवोदित साहित्यिकांपर्यन्त. त्यांचे नाव, गाव, शिक्षण, संपर्क साधने, त्याचे साहित्य, त्यांना मिळालेली बक्षिसे,पुरस्कार, त्यांचे आगामी साहित्य वगैरे , माहिती त्या साहित्यिकाचा फोटोसह प्रकाशित करणार असल्याने सर्व साहित्यिक आणि रसिक यांचा परस्परांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिचय होईल. संवाद वाढेल आणि साहित्य समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहचण्यास मदत होईल.

साहित्य
या सदरात आपण मराठी साहित्यातील महारथींबरोबरच काही नवोदितांच्या साहित्य कृतींचा आस्वाद घेणार आहोत. त्यामध्ये कथा, कविता, ललित , आणि इतरही बऱ्याच प्रकारचे साहित्य असेल . आजकाल बरेच साहित्यिक सोशल मीडियावर लिहितात. त्यामध्ये बरेचजण खूप छान लिहिणारेही आहेत. त्यांचे साहित्य या मंचावर एकत्र करण्याचाही हा एक प्रयत्न असणार आहे . इथे आपण व्यक्त होऊ शकतो आणि इतरांचे वाचुही शकतो. हा मंच प्रत्येक लिहिणार्यांसाठी मोफत उपलब्ध आहे . आपण आपले साहित्य संपादकांशी संपर्क करून इथे विनामूल्य प्रकाशित करू शकता.
पुस्तक परिचय
आज रोज नवनवी पुस्तके प्रकाशित होत असतात. ज्या प्रस्थापीत साहित्यिकांची पुस्तके बाजारात सहज मिळतात, किंवा जे साहित्यिक प्रसिद्ध आहेत त्यांच्या पुस्तकांची वाचकांना बऱ्यापैकी माहिती असते . पण ही परिस्थिती सर्वच पुस्तकांच्या बाबतीत नसते. मुळातच आजकाल पुस्तके वाचण्याचे प्रमाण थोडेसे कमी झाले आहे. त्यामुळे नवीन पुस्तके शोधून ती कोणी वाचेल असे सहसा होत नाही , पण पुस्तकाविषयी जर सहज माहिती मिळाली तर त्या पुस्तकाबद्दल वाचकांना उत्सुकता निर्माण होऊन ते पुस्तक मिळवून तो वाचू शकतो. त्यासाठी पुस्तकांची थोडक्यात परिचयस्वरूप माहिती आपण इथे प्रकाशित करणार आहोत .

साहित्य वार्ता
साहित्य क्षेत्रात रोजच कुठे ना कुठे छोटे मोठे कार्यक्रम होत असतात. पुस्तक प्रकाशन , कविसंमेलन , साहित्य संमेलन , परिसंवाद , व्याख्यानमाला , कार्यशाळा, साहित्यस्पर्धा , पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याची निवेदने , मेळावे, सत्कार सोहळे, पुरस्कार वितरण समारंभ, तसेच काही सुखद - दुःखद घटना असे काही ना काही सतत चालू असते, बरेच लोक निस्वार्थ भावनेने साहित्य चळवळ चालवत असतात, पण एखादा अपवाद वगळता हे सर्व त्या त्या परिसरापुरतेच मर्यादित राहते, कारण मोठी वर्तमानपत्रं किंवा वृत्तवाहिन्या अश्या छोट्या कार्यक्रमांना त्यांच्या काही मर्यादांमुळे राज्यस्तरावर प्रसिद्धी देऊ शकत नाहीत. साहित्य क्षेत्रातील अशा सर्व लहान मोठ्या घडामोडींचा आढावा आपण साहित्य वार्ता या सदरात घेणार आहोत. आपणही आपल्या कोणत्याही साहित्यविषक कार्यक्रमाची बातमी ( प्रेसनोट ) संपादकांशी संपर्क करून देऊ शकता.

एकूणच साहित्यासाठी समर्पित अशी हि वेबसाईट असून साहित्य, साहित्यिक आणि साहित्यरसिक यांच्यातला दुवा बनून आपण साहित्याच्या या रमणीय विश्वाची सफर करत साहित्याचा निर्भेळ आनंद घ्यावा एवढाच या वेबसाईटचा उद्देश आहे